शिवाजी महाराजांचा जन्म (Birth of Shivaji Maharaj On Shivneri Fort)
सोळाव्या
शतकात महाराष्ट्राच्या भूमीवर सुलतान शाही च्या अत्याचारी राजवटीने
धुमाकूळ घातला होता. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि दिल्ली
ची मुघल सत्ता यांच्या स्वार्थी लढाई धोरणामुळे गरीब रयतेचे अतोनात हाल होत
होते. यवनी लोकं मनात येईल तेव्हा महाराष्ट्राची अबू लुटत होते, गावंच्या
गावं उध्वस्त करणे,आया बहिणीची अब्रू लुटणे, हातातोंडाशी आलेल पीक जाळणे हे
नित्याचेच झाले होते. अशातच.......शिवाजी महाराजांचा जन्म (Birth of Shivaji Maharaj On Shivneri Fort).
१९ फेब्रुवारी १६३० या दिवशी "शिवनेरी" किल्ला नगारखान्यातील सनई चौघड्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाला. किल्ल्यावर आनंदी आनंद पसरला, जिजाऊ आईसाहेबांच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून बाळाचे नाव "शिवाजी" ठेवण्यात आले.
शिवनेरी चे किल्लेदार विजयराज हे शहाजी राजांच्या नात्यातलेच होते. अतिशय मोठ्या विश्वासाने शहाजी राजांनी जिजामाता यांच्या रक्षणाची जबाबदारी किल्लेदार विजयराज यांच्यावर सोपवली होती. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये अनेक मातब्बर सरदार मंडळी होती. जाधव, भोसले, घोरपडे, मोहिते, निंबाळकर,मोरे, देशपांडे, देशमुख एकापेक्षा एक शूर आणि साहसी परंतू .... सर्वच तुटपुंज्या वतनदारी साठी यवनी सत्तेची चाकरी करत होते. काही सरदार आदिलशहा कडे, काही निजामशहा कडे, तर काही मोंगलाकडे वतनासाठी लाचार होते.
Birth of Shivaji Maharaj with Shahaji Raje & Jijabai (शिवाजी महाराजांचे बालपण)
यवनीसत्ताधीश
आपल्या राजकीय स्वार्थासाठी एकमेकांशी लढाया करीत परंतू यामध्ये लढले जात
त्यांच्याकडे चाकरी करणारे सरदार. म्हणजेच मराठा सरदार विरुद्ध मराठा सरदार
अशीच लढाई होऊन शेवटी महाराष्ट्राचेच नुकसान होत असे. शहाजी
राजांनी या परिस्थितीचा विचार करून मराठा सरदारांना अनेक वेळा संघटित
करण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. शहाजी राजांच्या प्रयत्नाने
मात्र स्वातंत्र्याची ठिणगी मराठ्यांच्या मनात पेटली होती.
जिजाऊ आईसाहेबांच्या मनात यवनी सत्ते विरुद्ध खूप मोठी आग धगधगत होती. जिजामातेचे वडील लखुजी जाधव व भाऊबंध हे देखील या जुलमी यवनी सत्तेचे शिकार झाले होते. शहाजी राजे आणि जिजामाता यांच्या मनात स्वातंत्र्याच्या ज्योतीने जन्म घेतला होता.

जन्मानंतर सहावर्षे शिवरायांचे बालपण अतिशय धामधुमीत गेले. शहाजी राजांचा मोगल, आदिलशहा, आणि निजामशहा यांच्याबरोबर राजकारणाचा संघर्ष चालूच होता. वारंवार या सत्तेकडून त्यासत्तेकडे स्थित्यंतर, या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर धावपळ सारखी चालूच होती. निजामशाही कडे प्रामाणिक पणे सेवा बजावत असताना हलक्या कानाच्या निजामाच्या घाणेरड्या राजकारणी वृत्तीला शहाजी राजे कंटाळले होते. निजामाने भर दरबारात जिजामातेच्या वडिलांचा लखुजी जाधवांचा खून करवल्याने तर राजे दुखावले गेले होते. शेवटी शहाजी राजांनी निजामशाही सोडून मुघलांन कडे नोकरी पत्करली. बादशहा शहाजहानने शहाजीराजांना सरदारकी बहाल केली.
शहाजी
राजे मुघलांकडे गेल्यावर वजीर फत्तेखानाने निजामशहाची मुघलांशी संगनमत
करून हत्या करवली. संपूर्ण निजामशाही मध्ये गोंधळ माजला होता. वजीर
फत्तेखान सर्व निजामशाही मुघलांच्या घशात घालण्याचा डाव रचत होता. मात्र
शहाजी राजांनी निजामशाही वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. राजांनी निजामशहा
चा वंशज असणारा एक मुलगा पेमगिरी च्या किल्ल्यावर गादीवर बसवून त्यास
निजामशहा घोषित केले. या घोषित निजामशहाच्या नावाने अप्रत्यक्षपणे शहाजी
राजांनी एका नव्या निजामशाहीची सुरुवात केली. याचबरोबर हे राज्य
टिकवण्यासाठी शहाजी राजांचा मुघलांशी संघर्ष चालू झाला. आदिलशहा ने
सुरुवातीस राजांना मदत केली मात्र प्रत्यक्ष शहाजहान बादशहा दक्षिणेत शहाजी
राजांवर चालून आल्यावर मात्र त्याने मुघलांशी हातमिळवणी केली. शहाजीराजे
मोठ्या हिमतीने दोन्ही यवनी सत्ताना गनिमीकाव्याने शह देत होते. दुर्भाग्य
एवढेच होते कि इतर मराठी सरदार शहाजी राजांना मदत न करता विरोधच करत होते.
यवनांच्या बलाढ्य ताकदी समोर शहाजी राजाना १९३६ मध्ये मुघलांना शरण जावे
लागले.
घोषित निजामशहा आणि शहाजी राजांनी निजामशाही वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न यादरम्यान स्वातंत्र्याची प्रेरणा आणि आपल्या वडिलांचे शौर्य यांचा वृत्तांत बाळ शिवाजींच्या कानावर पडत होता. राम - कृष्ण , महाभारत यातील कथा साधू संतांचे विचार यांचे सुसंस्कार जिजामाता शिवबा राजांवर करतच होत्या परंतु बरोबरच
यवनांच्या अत्याचाराच्या गोष्टी शिवरायांच्या कानी येत.
यवनांच्या अत्याचाराच्या गोष्टी शिवरायांच्या कानी येत.
अशाप्रकारे जिजामातेच्या सावलीमध्ये सुसंस्कृत शिवाजी राजे घडत होते. खरेतर आपल्या अभंगांनी,
कीर्तनांनी, महाराष्ट्रभर संतमंडळींनी स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत ठेवली होती. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ यांचे अभंग, चरित्र शिवरायांच्या मनात संत मंडळी विषयी आदरभाव निर्माण करत. शूर पुरुषांच्या गोष्टी राजांना त्यांच्यासारखा पराक्रम करण्याची प्रेरणा देई आणि यवनांचे ऐकलेले अत्याचार
स्वातंत्र्याची आस मनात निर्माण करी.

जन्मापासून शहाजी राजांच्या मोगलांच्या १९३६ मधल्या तहापर्यंत सहावर्षे शिवाजीराजांचे कधी या
किल्ल्यावर तर कधी त्या किल्ल्यावर जिजामाता सोबत संघर्षमय बालपण घडत होते.
शिवाजी महाराजांचा जन्म (Birth of Shivaji Maharaj On Shivneri Fort) हि पोस्ट आपणांस आवडली काय, कृपया शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास (History Of Shivaji Maharaj In Marathi) वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

!!! छ्त्रपती शिवाजी महाराज कि जय !!!
शिवाजी महाराजांचा जन्म (Birth of Shivaji Maharaj On Shivneri Fort)
Reviewed by Prashant Wagh
on
जानेवारी २१, २०१९
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा