Shahaji Maharaj History In Marathi शहाजी महाराजांचा इतिहास
पंधराव्या
शतकामध्ये संपूर्ण भारत भूमीवर परकीय सत्तांचे राज्य पसरले होते. दिल्ली मधून कारभार पाहणारी मोगल सत्ता ही प्रमुख असली तरी दक्षिण भारतात आदिलशाही, निजामशाही, आणि कुतुबशाही या सत्ता राज्य करत होत्या. संपूर्ण भारत या परकीयांच्या हातात असला तरी या सत्तांचे एकमेकांत कमालीचे वैर होते. सदासर्वकाळ हे सत्ताधीश दुसऱ्यांचा प्रदेश बळकावण्याचे राजकारण करीत असत. त्यांच्या या राजकीय संघर्षामध्ये बळी मात्र मराठी, राजपूत, या स्थानिक सरदारांचा,सैनिकांचा, मुलाबाळांचा तसेच आयाबहिणीचा जात असे. कारण भारताचे हे वीर या सत्तांच्या दिलेल्या जहागिरी, वतने यांना भुलून त्यांचे ईमानी गुलाम झाले होते. ज्या भूमीचे ते खरे मालक होते ती भूमी परकीयांच्या ताब्यात होती आणि याच भूमीवर ते गुलाम असताना जहागीरदार,सरदार, वतनदार म्हणून खोटी आब मिरवीत होते. मराठी सरदारांनी केलेल्या अजोड़ पराक्रमाला कपटी सुल्तानांच्या लेखी काडीमात्र किमत न्हवती. राजकीय आकांक्षेपोटी शूर मराठी सरदारांना एकमेकांत लढण्यास भाग पाडले जाई. एव्हाना मराठी सरदारांच्या पराक्रमावर उभेराहिलेले यांचे तख्त सर्व मराठे एकत्र आले असता क्षणात धुळीस मिळाले असते. मराठे एकत्र येऊ नयेत यासाठी मात्र सर्व पातशहा अतिशय जागरूक होते. चला तर जाणून घेऊया शहाजी महाराजांचा इतिहास (Shahaji Maharaj History In Marathi) -
Image Credit - Google Images
Shahaji Maharaj |
शहाजी महाराज स्वराज्याचे स्वप्न निर्माते (Shahaji Maharaj History In Marathi - Shahaji Maharaj who creates a dream of "Swarajya")
मालोजी राजे भोसले यांना दोन मुले झाली होती. शहाशरीफ या फकीराच्या आशीर्वादाने ही दोन मुले त्यांना झाली. त्यामुळे मालोजी राजेंनी त्यांची नावे शहाजी आणि शरीफजी ठेवली होती. शहाजी राजांचा जन्म स. १५९४ साली झाला. लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाईयांचा जन्म स. १५९५ साली झाला. मालोजी राजे व लखुजी यांनी शहाजी व जिजाबाई यांचा विवाह करण्याचे ठरविले. आणि स. १६०५ मध्ये दोघांचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. त्याच वेळी मालोजीराजांना निजामशाहाकडून पुणे-सुपेची जहागीरी मिळाली.पुढे मालोजी राजे दुसऱ्याच वर्षी म्हणजे स. १६०६ मध्ये मृत्यू पावले. त्यामुळे शहाजी व शरीफजी यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांची आई उमाबाई आणि चुलता विठोजी यांच्यावर पडली. त्यांनी ती उत्तम प्रकारे पारही पाडली. मालोजीप्रमाणे विठोजी हाही निजामशाहाचा प्रामाणिक सेवक होता. आणि त्यांच्याकडे धारूरची जहागिरी होती. विशेष म्हणजे त्यांना आठ मुले होती. स. १६११ साली विठोजी हेही मरण पावले.
शहाजी राजांचे सामर्थ्य
महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन ठिकाणी शहाजी राजांनी जहागिरी मिळविली होती. निजामशाहीची स्थापना करून झाली. आणि नंतर मोगलांशी टक्कर देत असताना त्यांनी चाळीस हजार सैन्य तयार केले होते. पुढे ते आपल्या निवडक सैन्या सोबत कर्नाटक मध्ये गेले. तेथेही त्यांनी सामर्थ्यशाली सैन्य तयार केले. त्यांच्या खाजगी घोडदलात तीन हजार घोडेस्वार होते. गोव्या मधीलव्हाईसरॉय यांनी स. १६६४ मध्ये असे लिहिले आहे की, शहाजी राजांचे वार्षिक उत्पन्न वीस लाख पंचाहत्तर हजार होन होते. तेव्हा शहाजी राजे हे कोणी सामान्य व्यक्त्ती नव्हते हे लक्षात येते. परकीयांच्या पदरी असले तरी चहुबाजूने शत्रू असताना आपले वेगळे सामर्थ्य निर्माण करणे यांस तोड न्हवती. मराठा सरदारांनी साथ दिली असता स्वराज्याची सुरुवात शहाजी राजांकडूनच झाली असती. राजांनी असंख्य वेळा प्रयत्न करून मराठा सरदारांना एकत्र करणे मात्र साधता आले नाही. परंतु जिजाऊ शहाजींनी पाहिलेल्या स्वराज्य स्वप्नाची आग मात्र तेवत राहिली.
राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कर्ता
मराठी संस्कृती व कर्नाटकची संस्कृती या दोन्हीचा सुंदर मिलाफ साधण्याचा प्रयत्न शहाजीराजांनी केलेला होता. तसेच त्या ठिकाणी राहणाऱ्या हिंदूंमध्ये जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न् त्यांनी केला होता . राष्ट्रीय एकात्मतेसाठी झटणारा पहिला थोर पुरुष म्हणून शहाजी महाराजांचा नामनिर्देश नक्कीच झाला पाहिजे. आणि असे म्हैसूर सरकारनेही त्यांचा गौरव करताना म्हटले आहे. महाराष्ट्रात प्रथम शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचा सफल प्रयत्न केला. यापुढे जाऊन हिंदुस्थानातील राजपुतादी सर्व हिंदू राजांनी मोगलांविरुद्ध आघाडी उभारावी असे मनोगतही त्यांनी व्यक्त केले होते.
हिंदू धर्माचा रक्षक
हिंदू धर्म व संस्कृती यांच्या परंपरांचे पुनरुज्जीवन शहाजी राज्यांच्या कारकिर्दीत होत. आपल्या मुलखातील प्राचीन हिंदू मंदिरांचे पावित्र्य जतन करण्याबद्दल त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या सक्त आज्ञा होत्या. डॉ. बाळकृष्ण म्हणतात कि शहाजी महाराज हे त्या काळातील सर्वश्रेष्ठ सेनानायक होते. त्यांनी दीनदुबळ्यांचे संरक्षण केले व दुर्जनांचा नाश केला. महाराज हे स्वधर्मरक्षक होते अशी प्रशस्ती खुद्द श्री गागाभट्टानी केली आहे. हिंदू धर्म व मंदिरे यांचा रक्षक म्हणूनच शहाजीपुत्र शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला अशी माहिती हिंदुस्थानाच्या इतिहासात प्रसिद्ध आहे.
शहाजी राजे मोगल बादशाहाकडे
मलिक अंबरनंतर निजामशाहीचा कारभार त्यांचा पुत्र फत्तेखान यांच्याकडे गेला होता. हा फत्तेखान मात्र आपल्या वडीलांनसारखा कर्तबगार नव्हता. तसेच स्वार्थी व दृष्ट स्वभावाचा होता. खुद्द मुर्तजा निजामशहा हा अतिशय हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे त्याच्या दरबारात कारस्थाने व हेवेदावे खूप चालत होते. परिणामी खुद्द निजामशहाने फत्तेखानास कैदेत टाकले आणि लखूजीजाधवांसारख्या बलदंड सरदारास दरबारात बोलावून त्याच खून केला. त्यांचे हे विश्वासघातकी कृत्य पाहून शहाजी राजे हबकून गेले. उद्या आपल्यावरही अशीच वेळ येऊ शकते असे त्यांना वाटले. याच वेळी अदिलशाही व मोगली
फौजा एक होऊन शहाजी राजांच्या पुणे जहागिरीत शिरल्या.
Image Credit - Google Images
आदिलशाही सेनानी मुरार जगदेव व रणदुल्लाखान यांनी पुणे कसबा बेचिराख केला. आणि त्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवला. शेवटी या सर्वांचा कंटाळा येऊन राजांनी मोगलांकडे संधान बांधले. व मोगली सरदार अजमखान यांच्या मार्फत त्यांनी स. १६३० मध्ये मोगलांची पाच हजारांची मनसब स्वीकारली. दरम्यान दि १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
Raje Lakuji Jadhavrao Wada – Sindkhedraja |
आदिलशाही सेनानी मुरार जगदेव व रणदुल्लाखान यांनी पुणे कसबा बेचिराख केला. आणि त्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवला. शेवटी या सर्वांचा कंटाळा येऊन राजांनी मोगलांकडे संधान बांधले. व मोगली सरदार अजमखान यांच्या मार्फत त्यांनी स. १६३० मध्ये मोगलांची पाच हजारांची मनसब स्वीकारली. दरम्यान दि १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
शहाजी राजे पुन्हा निजामशाहीकडे
या सुमारास दक्षिणेमध्ये भीषण दुष्काळ पडला होता.पक्षी, प्राण्यांबरोबर माणसे देखील अन्न पाण्यांवाचून तडफडून मरत होते. तिकडे निजामशाहीतून शहाजीराजे निघून गेल्यावर निजामाने फत्तेखानास कैदेतून मुक्त करून त्याला आपला वजीर केले. या फत्तेखानाने निजामशाहीचे रक्षण करण्याऐवजी मोगलांशी अंतस्थ राजकारण करून खुद्द मुर्तजा निजामशाहाचाच खून केला. आणि त्याच्या वंशातील हुसेन नावाचा मुलगा गादीवर बसवला. विशेष म्हणजे मोगलांनी शहाजी राजांची मनसब परस्पर फत्तेखानाला देऊन त्यास खुश करण्याचा प्रयत्न केला. निजामशहा काय, आदिलशहा काय किंवा मोगल काय सर्वच संधिसाधूपणाचे राजकारण खेळत होते. शहाजी राजांच्या पराक्रमाचे कुठेच चीज होत नव्हते. आपल्या वाडवडिलांनी ज्या निजामशाहीच्या उत्कर्षासाठी आपले बलिदान केले ती निजामशाही आता फत्तेखानाच्या फितुरीमुळे मोगलांच्या घशात जाणार, हे शहाजी राजांना स्पष्टपणे दिसत होते.
शहाजी राजांनी केलेले निजामशाहीचे पुनरुज्जीवन
निजामशाही वाचविण्याचा निर्णय शहाजी राजांनी घेतला. त्यासाठी आदिलशहाच्या दरबारातील मुरार जगदेव व खवास खान या दोन सेनानींचा पाठिंबा त्यांनी मिळविला. आणि कोकणातील निजामशाहीच्या वंशातील एक मुलगा शोधून काढून स. १६३२ रोजी त्यास जुन्नर जवळच्या पेमगिरी या किल्ल्यावर नवा निजामशहा म्हणून घोषित केले. परिणामी आता शहाजी राजांचे मोगलांशी उघड उघड शत्रुत्व सुरु झाले. फत्तेखानाचा निजामशहा दौलताबादेला होता. त्या किल्ल्यास मोगल सेनानी महाबतखान याने वेढा घातला. म्हणजेच फत्तेखान आतून फितूर झाल्यामुळे दौलताबाद किल्ला व त्यातील हुसेन निजामशहासह महाबतखानाच्या हाती पडला. शहाजहानने फत्तेखानाचा गौरव करून त्यास दोन लाखांची नेमणूक दिली. बिचारा हुसेनशहा तुरुंगात जाऊन पडला.
Daulatabad Fort |
शहाजी महाराजांची एकाचवेळी मोगल आणि आदिलशाही या बलाढ्य सत्ताशी लढाई (At a Time Fights with Mogal & Adilshaha In Shahaji Maharaj History In Marathi) –
फत्तेखानाचा निजामशहा कैद झाला तरी शहाजी राजांनी स्थापन केलेला निजामशहा पेमगिरीवर होताच. मोगलांचा धोका आपल्यालाही आहे हे जाणून आदिलशहाने या प्रसंगी शहाजी राजांना आपले साह्य दिले. राजानीं आपल्या गनिमी काव्याने मोगली फौजांशी सतत तीन वर्ष संघर्ष चालू ठेवला. बागलाणपासून नीरा नदीपर्यंत व किनारपट्टीपासून अहमदनगरपर्यतच्या प्रदेशावर त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. तथापि शहाजी राजांनी निर्माण केलेल्या या निजामशहाच्या प्रकरणाचा कायमचा निकाल लावण्यासाठी आता खुद्द मोगल बादशहा शहाजहान दक्षिणेला आला. दौलताबादेस मुक्काम करून तो शहाजीराजांवरील
मोहीम चालवू लागला. खानजमान व शाहिस्तेखान या दोन सेनानी बरोबर त्याने मोठ्या फौज देऊन त्यांना शहाजी राजांविरुद्ध पाठविले. राजांनी या फौजांशी गनिमी पद्धतीने लढून त्यांना हैराण केले. पण याच वेळी शहाजहानच्या दडपणाखाली आदिलशहाने मोगलांशी सहकार्य करण्याचे कबुल केले. ६ मे १६३६ रोजी उभयपक्षी तह होऊन निजामशाही बुडविण्याचा त्यांचा इरादा पक्का झाला. आता पावसाळा सुरु झाला. तरीही मोगली व आदिलशाही फौजा शहाजी राजांवर चालून गेल्या. मोठा संघर्ष घडून आला. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही शहाजी राजांनी पाच - सहा महिने संयुक्त फौजांशी टक्कर दिली. शेवटी त्यांची शक्ती अपुरी पडली. त्यांनी निर्माण केलेल्या निजामशाहासह ते मोगलांना शरण गेले. दक्षिणेतील राजकारणात एका मराठा सरदाराने केलेले हे अभूतपूर्व असे धाडस होते. त्याचा शेवट जरी चांगला झाला नसला तरी मराठ्यांच्या दृष्टीने ते धाडस अपूर्व होते. हीच मराठ्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत निर्माण होण्याची निशाणी होती. यानंतर शहाजीराजे मोगल बादशाहीच्या चाकरीत गेले नाहीत. त्यांनी रणदुल्लाखान या आदिलशाही सरदारामार्फत आदिलशाहीची चाकरी स्वीकारली. आदिलशहाने त्यांना बारा हजारी मनसबदारी दिली. तसेच त्यांच्याकडे पुणे- सुपेची जहागिरी कायम ठेवली. शहाजी सारखा खटपटी व सामर्थ्यशाली सरदार महाराष्ट्रात मोगल व आदिलशाही यांच्या सीमेवर ठेवण्यापेक्षा त्यास कर्नाटकात दूरच्या कामगिरीवर पाठविण्याचे आदिलशहाने ठरविले.
शहाजी राजांचा मृत्यू ( Death Of Shahaji Maharaj In Shahaji Maharaj History In Marathi)
महाराष्ट्रातून कर्नाटकात गेल्यावर अली आदिलशहाने शहाजी राजांना बेदनूरच्या राज्यावर पाठविले. बेदनूरच्या नायकाला शरण आणून स्वारीवरून परत बंगळुरास येत असताना शिमोगा जिल्ह्यातील होदिगेरे या गावी त्यांनी मुक्काम केला. शहाजी राजांना शिकारीचा भारी छंद या मुक्कामात ते शिकारी साठी बाहेर पडले असताना घोड्याचा पाय जाळीत अडकल्याने घोड्यावरून पडून त्यांचा स. २३ जानेवारी १६६४ रोजी अपघाती मृत्यू झाला. स्वराज्याचा खूप मोठा आधार संपला.
Shahaji Maharaj History In Marathi शहाजी महाराजांचा इतिहास
Reviewed by Prashant Wagh
on
जानेवारी १२, २०१९
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा