Chhatrapati Shivaji Maharaj History In Marathi (छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास)
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० किल्ले "शिवनेरी " ते मृत्यू ३ एप्रिल १६८० किल्ले राजधानी "रायगड". पन्नास वर्षांच्या आयुष्यात हिंदुस्थान च्या भूमीवर वडील शहाजी राजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या "स्वराज्य" स्वप्नाला सत्यात आणून मराठे शाही च्या रूपात रयतेचे "स्वराज्य " निर्माण करणारे "छत्रपती" महाराज.जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास (Shivaji Maharaj History In Marathi) -
आज ३५० वर्षानंतर देखील फक्त नाव घेताच अंगावर रोमांच उभे करणारे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या तरुणाईचे चैतन्य, प्रेरणा, आणि मार्गदर्शक. कित्येक व्यवसायानं मध्ये व्यवसाय प्रतिनिधींचा उत्साह कायम ठेवण्यासाठी मोठमोठ्या उत्साह वाढवणाऱ्या भाषण कर्त्याच्या कार्यक्रमासाठी प्रचंड खर्च करावा लागतॊ. परंतु आजही व्यवसाय अथवा कोणतीही स्पर्धा असो शिवरायांचे नाव घेऊन मैदानात उतरलेला व्यक्ती अर्धी लढाई अगोदरच जिंकलेला असतो.
वारकरी संप्रदाय म्हणतो आम्ही "संत ज्ञानेश्वर", "संत तुकाराम" यांना पुजतो कारण या संतांच्या चरित्राच्या, ग्रंथांच्या, अभंगांच्या माध्यमातून आम्हास खरे संस्कार समजले. त्यांचे तंतोतंत आचरण सुलभ जीवन आणि ईश्वर नामजपाने सुखाची सर्वोच्च आत्मभूती मिळते. अगदी त्याच प्रमाणे प्रत्येक मराठी घरांमध्ये मुलांमध्ये योग्य संस्कार रुजवण्यासाठी शिवरायांचा इतिहास सांगितला जातो.
शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र परिपूर्ण मानव कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. संस्कार कसे असावेत, योग्य मार्ग कसा निवडावा, वेळेचे महत्व, नियोजन पूर्वक कामे पूर्ण कशी करावीत, म्हणजेच आजकाल मॅनेजमेंट क्षेत्रासाठी जे काही सर्वोत्तम लागते त्याचे सर्वगुणसंपन्न उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
आपल्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये महाराजांनी अनेक माणसे जोडली. एक एक करत अनेक लढवय्ये मावळे स्वराज्याची ताकत बनले. प्रत्येक आक्रमणांमध्ये कामी आलेल्या मराठी रक्ताने स्वराज्याची उभारणीं झाली. स्वराज्य"मराठा साम्राज्य" रयतेच्या, मावळ्यांच्या, त्यागावर, रक्तावर निर्माण झाले.
शहाजी राजांकडून शिवाजी राजांना २००० सैन्य पुणे आणि सुपे जहागिरीचा सांभाळ करण्यासाठी मिळाले होते. त्या २००० सैन्याचे लाखोंच्या फौजेत रूपांतर करून राज्य सुरक्षितता हेतू ३५० हुन ज्यास्त किल्ले शिवरायांनी जिंकले आणि नवीन निर्माण केले. शत्रूच्या लाखांच्या फौजेला ५०० मनुष्यबळ असणारा शिवाजी महाराजांचा एकच किल्ला पुरून उरत असे. हजारोंचे सैन्य किल्ल्यावर असताना शिवाजी महाराजांचे ५० ते ६० मावळे लीलया किल्ला जिंकत असत. या अचाट पराक्रमाला शिवाजी महाराजांच्या अतुलनीय नियोजन आणि बुद्धी कौशल्याची जोड असे.
शिवछत्रपतींच्या काळात साम्राज्याचे प्रतीक, ताकत आणि शौर्य किल्ल्यांच्या रूपात जोखले जाई. रायगड सारखा बेजोड किल्ला स्वराज्याची राजधानी शिवरायांनी निवडणे यातच किल्ल्यांचे महत्व आपणांस कळून येते. शिवरायांचे हेच गडकोट आजही तमाम युवकांचे प्रेरणा स्थान बनून दिमाखात उभे आहेत. पुढील काही पोस्ट मधून शिवरायांची युद्धनीती "गनिमी कावा" आणि किल्ल्यांचा इतिहास यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास (Shivaji Maharaj History In Marathi) - आपणां समोर सादर करत आहे. नक्की वाचा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका.
२. जिजाऊ आई साहेबांचा इतिहास
३. शिवाजी महाराजांचा जन्म
४. स्वराज्याची शपथ
आज ३५० वर्षानंतर देखील फक्त नाव घेताच अंगावर रोमांच उभे करणारे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या तरुणाईचे चैतन्य, प्रेरणा, आणि मार्गदर्शक. कित्येक व्यवसायानं मध्ये व्यवसाय प्रतिनिधींचा उत्साह कायम ठेवण्यासाठी मोठमोठ्या उत्साह वाढवणाऱ्या भाषण कर्त्याच्या कार्यक्रमासाठी प्रचंड खर्च करावा लागतॊ. परंतु आजही व्यवसाय अथवा कोणतीही स्पर्धा असो शिवरायांचे नाव घेऊन मैदानात उतरलेला व्यक्ती अर्धी लढाई अगोदरच जिंकलेला असतो.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj History In Marathi) -
वारकरी संप्रदाय म्हणतो आम्ही "संत ज्ञानेश्वर", "संत तुकाराम" यांना पुजतो कारण या संतांच्या चरित्राच्या, ग्रंथांच्या, अभंगांच्या माध्यमातून आम्हास खरे संस्कार समजले. त्यांचे तंतोतंत आचरण सुलभ जीवन आणि ईश्वर नामजपाने सुखाची सर्वोच्च आत्मभूती मिळते. अगदी त्याच प्रमाणे प्रत्येक मराठी घरांमध्ये मुलांमध्ये योग्य संस्कार रुजवण्यासाठी शिवरायांचा इतिहास सांगितला जातो.
शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र परिपूर्ण मानव कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. संस्कार कसे असावेत, योग्य मार्ग कसा निवडावा, वेळेचे महत्व, नियोजन पूर्वक कामे पूर्ण कशी करावीत, म्हणजेच आजकाल मॅनेजमेंट क्षेत्रासाठी जे काही सर्वोत्तम लागते त्याचे सर्वगुणसंपन्न उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
शून्यातून स्वराज्य निर्मिती
आपल्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये महाराजांनी अनेक माणसे जोडली. एक एक करत अनेक लढवय्ये मावळे स्वराज्याची ताकत बनले. प्रत्येक आक्रमणांमध्ये कामी आलेल्या मराठी रक्ताने स्वराज्याची उभारणीं झाली. स्वराज्य"मराठा साम्राज्य" रयतेच्या, मावळ्यांच्या, त्यागावर, रक्तावर निर्माण झाले.
शहाजी राजांकडून शिवाजी राजांना २००० सैन्य पुणे आणि सुपे जहागिरीचा सांभाळ करण्यासाठी मिळाले होते. त्या २००० सैन्याचे लाखोंच्या फौजेत रूपांतर करून राज्य सुरक्षितता हेतू ३५० हुन ज्यास्त किल्ले शिवरायांनी जिंकले आणि नवीन निर्माण केले. शत्रूच्या लाखांच्या फौजेला ५०० मनुष्यबळ असणारा शिवाजी महाराजांचा एकच किल्ला पुरून उरत असे. हजारोंचे सैन्य किल्ल्यावर असताना शिवाजी महाराजांचे ५० ते ६० मावळे लीलया किल्ला जिंकत असत. या अचाट पराक्रमाला शिवाजी महाराजांच्या अतुलनीय नियोजन आणि बुद्धी कौशल्याची जोड असे.
शिवाजी महाराजांचा इतिहास (Shivaji Maharaj History In Marathi)
शिवाजी महाराजांचा इतिहास (Shivaji Maharaj History In Marathi) वाचण्यासाठी खालील मुद्द्यांवर क्लिक करा -
१. शहाजी महाराजांचा इतिहास२. जिजाऊ आई साहेबांचा इतिहास
३. शिवाजी महाराजांचा जन्म
४. स्वराज्याची शपथ
Chhatrapati Shivaji Maharaj History In Marathi (छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास)
Reviewed by Prashant Wagh
on
जानेवारी ०८, २०१९
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा